संगलट,खेड/इक्बाल जमादार:-या आधुनिक युगात गावागावात पुर्वी एकच टीव्ही असायचा त्यासमोर गावातील सर्वच लोक बसून विविध कार्यक्रम पाहायचे पण हे कार्यक्रम काही काळावधी पुरतेच मर्यादित असायचे आता तर प्रत्येक गावात प्रत्येक घरोघरी एलईडी टीव्ही संच आल्याने घराघरातील महिलांपासून ते मुलांपासून सर्वजण टीव्हीसमोर बसलेली असतात याचा परिणाम म्हणजे माणुसकी पण हरवल्याचं गावागावातून पहावयास मिळत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात एखाद्या गावात एक टीव्ही असायचा त्यावेळी गावातील महिला तरुण मंडळी मुलं मोठ्या हौसेने एखाद- दुसरा कार्यक्रम पाहयचे मात्र हा कार्यक्रम पहात असताना त्याला वेळ मर्यादा असायची अनेक प्रकारची
आजच्या युगासारखे विविध चॅनेल नव्हते फक्त पाहिलं जायचं ते दूरदर्शनचा एक चानेल आणि तोही ठराविक कालावधी पुरतेच कार्यक्रम असायचे. आजच्या युगात अनेक चॅनेल
आणि विविध कार्यक्रम यातून सतत घराघरातील महिला तर त्यात गुंग होऊन जातात त्यांनी तर सर्व माणुसकीपण हरवून गेलेली आहे. असे काहीसे चित्र पहावयास मिळत आहे. कार्यक्रमात कीती वेळ गुंतून राहायला हवे हे प्रत्येकाने लक्षात घेण्याची गरज वाटू लागली आहे. त्याच बरोबर विविध वाहिन्यांवरील आपली मुलं कोणते कार्यक्रम पाहतात याकडे देखील आई-वडिलांचे लक्ष असणे गरजेचे आहे. कारण याच कार्यक्रमांचा या लहान मुलांवर परिणाम होत असतो त्यांची काळजी
घेणे काळाची गरज आहे. आता तर स्मार्ट टीव्ही आणि मोबाइल या दोन गोष्टी मुलांच्या हातात मिळाल्या की, मुले सतत मोबाईलचा वापर करून स्मार्ट टी.व्ही वर विविध गेम खेळण्यात मग्न होऊन जातात आणि मग मात्र त्याचा परिणाम ह्या मुलांच्या नजरेवर मुलांच्या राहणी मानावर मुलांच्या शरीरावर मानसिकतेवर सर्वबाजूंनी परिणाम होत असतो आणि अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ पालकांवर येत असतं त्यामुळे मुलांकडे किती वेळ मोबाईल द्यायचा किती वेळ खेळायला द्यायचं याकडे गांभीर्याने प्रत्येकाने पाहण्याची गरज आहे.
मोबाईच्या अतिवापराने माणुसकी चालली हरवत
